Mega Block लाही ‘लेटमार्क’; तिन्ही मार्गावरील प्रवाशांचे हाल

78
Mega Block लाही 'लेटमार्क'; तिन्ही मार्गावरील प्रवाशांचे हाल
Mega Block लाही 'लेटमार्क'; तिन्ही मार्गावरील प्रवाशांचे हाल

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक ही मेगाब्लॉकमुळे (Mega Block) दुसऱ्याही दिवशी खोळंबलेली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ब्लॉक सकाळी ५.३० पर्यंत होता, मात्र गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने तिन्ही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्या. ज्यामुळे तिन्ही मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. पश्चिम रेल्वेवरील सेवा विरार (Virar) ते अंधेरी (Andheri) दरम्यान सुरु असल्याने तिथून पुढे दादर, चर्चगेट स्थानकात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना खुप त्रास झाले. (Mega Block)

( हेही पाहा : Uniform Civil Code लागू करणारे पहिले राज्य ठरले उत्तराखंड; २७ जानेवारीपासून होणार अंमलबजावणी

मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटीपर्यंत (CSMT) जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच सुरु होत्या. मुंबईतील मस्जिद बंदरजवळील कर्नाक पुलावर गर्डर घेण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता, ते काम पूर्ण न झाल्याने ५.३० चा ब्लॉक ११.०० च्या आसपास संपला. मात्र या कालावधीत प्रवाशांचे फार हाल झाले. प्रजासत्ताकदिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सीएमएमटी मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयकडे जाणाऱ्या शासकीय नोकरदारांचेही हाल यावेळी मेगा ब्लॉकमुळे झाल्याचे पाहायला मिळाले. (Mega Block)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.