MSRTC Bus Financial Report : भाडेवाढीनंतरही एसटीची आर्थिक स्थिती जेमतेमच; २००-३५०० कोटी रुपयांची देणी थकित

MSRTC Bus Financial Report : दररोज केवळ दोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तरीही प्रवासी गळतीला सुरुवात झाली आहे.

62

एसटीची आर्थिक स्थिती (Financial status) डबघाईला आली आहे. एसटीच्या आर्थिक संकटाच्या काळात सुधारणा व्हावी, यासाठी प्रशासनाने तीन आठवड्यांपूर्वी १४.९५ टक्के दरवाढ केली आहे. (ST Bus Fare Hike) असे असूनही उत्पन्नात दररोज केवळ दोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच प्रवासी गळतीला सुरुवात झाली आहे. (MSRTC Bus Financial Report)

(हेही वाचा – अंतराळात अडकलेल्या Sunita Williams लवकरच परत येणार; नासाने पाठवले विशेष यान)

एसटीपेक्षा खासगी बसगाड्यांचे तिकीट कमी (ST ticket Hike) असल्याने लाखभराहून अधिक प्रवासी कमी झाले आहेत. असे असले, तरी निधीअभावी एसटीची सुमारे ३२००-३५०० कोटी रुपयांची देणी थकली आहेत.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी (PF), आयुर्विमा महामंडळाच्या विम्याचे हप्ते हे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापले आहे; परंतु ही रक्कम त्या त्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेली नाही. उपदान (ग्रॅच्युईटी), कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देण्यांसह डिझेल खरेदीची बिलेही थकली आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात एसटीला भरीव मदत मिळाली, तरच परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. (MSRTC Bus Financial Report)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.