MSRTC Bus: वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता घरबसल्या कळणार ‘लालपरी’चे लोकेशन            

85

महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी बसमधून (ST Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. शहरापासून खेड्या-पाड्यात जाणाऱ्या बस गाड्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच  एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या (MSRTC App) माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन (MSRTC App) मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ समजणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (VLT) बसविले असल्याने अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे. (MSRTC Bus)

राज्यभरात ५० हजार मार्गावर एसटीच्या सव्वालाख फेऱ्या होत असतात. यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नाही. यासाठी महामंडळाने तयार केलेल्या व्हीएलटीच्या मदतीने बस थांबे व त्यांच्या निवडलेल्या स्थानकात ती येण्याचा अपेक्षित वेळ २४ तास आधी समजणार आहे. यासाठी रोस मार्टा कंपनीने (Ros Marta Company) रूट मॅपिंग (Route mapping) पूर्ण केले असून त्याचे सिस्टिममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण झाले आहे. सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमधील बदल त्यामध्ये इंटिग्रेट करणे सुरू असून येत्या काही आठवड्यांत हे काम पूर्ण होणार आहे.

(हेही वाचा – आरेतील झाडे तोडू नका; Supreme Court ने मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिले आदेश)

मुंबई सेंट्रलमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन

एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन (MSRTC Live Location) समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे हे देखील समजणार आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली. याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.