टिटवाळा (Titwala) येथे तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची (Central Railway ) सेवा प्रभावित झाल्याचे पाहायला मिळालेल. बदलापूर (Badlapur) येथे देखील तांत्रिक बिघाड झाल्याने सेंट्रल रेल्वेची अप मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने कर्जत आणि कसारा या दोन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा १५ ते २० मिनीटे उशीराने सुरू आहे. (Mumbai Local)
कसारा मार्गावारून कल्याणला येणारी रेल्वे सेवेत टिटवाळा येथे बिघाड झाला आहे. तर कर्जतहून कल्याणला येणाऱ्या रेल्वे मार्गावर बदलापूर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रेल्वे या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामावर पोहचण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Mumbai Local)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community