
माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी (23 मार्च) मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. (Mumbai Local Mega Block)
मध्य रेल्वे – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावतील. (Mumbai Local Mega Block)
स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
पश्चिम रेल्वे – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. चर्चगेट येथे जाणाऱ्या काही फेऱ्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्याच स्थानकातून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. (Mumbai Local Mega Block)
स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
हार्बर रेल्वे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी / बेलापूर / पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. (Mumbai Local Mega Block)
स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : सकाळी ११.१० ते सायं ४.१०
हेही पहा-
Join Our WhatsApp Community