कुलाबा ते सीप्झ (Colaba to Seepz) मेट्रो ३ ही मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) तपासणीला सुरुवात झाली आहे. (Mumbai Metro 3) त्यामुळे सीएमआरएसकडून प्रमाणपत्र मिळताच या मेट्रोचा दुसरा टप्पा काही दिवसांत सुरू होणार आहे. बीकेसी, धारावी, शितळादेवी मंदिर, दादर, सिद्धीविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक या दरम्यान ही मेट्रो धावेल. या दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मार्गाची लांबी ९.७७ किलो मिटर आहे.
(हेही वाचा – https://www.marathi.hindusthanpost.com/social/call-to-participate-in-savarkar-literature-reading-activities/)
सीएमआरएस पथकाने सोमवार, ७ एप्रिलपासून या तपासणीला सुरुवात केली आहे. पुढील तीन ते चार दिवस ही तपासणी चालणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळताच ही मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळून मेट्रो मार्गिका सुरू होऊ शकेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मेट्रो गाडीच्या मार्गावरील चाचण्या सुरू
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (Mumbai Metro Rail Corporation) ३३.५ किमी लांबीची मेट्रो ३ मार्गिका उभारली जात आहे. त्यावर २७ स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी मार्ग ऑक्टोबरपासून सुरू झाला. या मार्गावर १० स्थानकांवर मेट्रो धावू लागली आहे. आता बीकेसी ते वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. एकूण सहा मेट्रो स्थानकांदरम्यान मेट्रो गाडी धावणार आहे. त्यातून आरे ते वरळी नाका असा प्रवास मेट्रोने करणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने एमएमआरसीने मेट्रो गाडीच्या मार्गावरील चाचण्या सुरू पूर्ण केल्या आहेत. (Mumbai Metro 3)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community