Mumbai Metro: मेट्रोचा वेग वाढला! मुंबईकरांचा वेळ वाचणार, मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावणार

35
Mumbai Metro: मेट्रोचा वेग वाढला! मुंबईकरांचा वेळ वाचणार, मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावणार
Mumbai Metro: मेट्रोचा वेग वाढला! मुंबईकरांचा वेळ वाचणार, मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावणार

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील मेट्रो (Mumbai Metro) गाड्या आता सुसाट चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही मार्गिकांवरील नियमित संचलनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस) (CCRS), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील मेट्रा गाड्या ताशी ५० ते ६० किमीऐवजी ताशी ८० किमी वेगाने धावणार आहे. (Mumbai Metro)

हेही वाचा-नव्या कायद्यानुसार प्रथमच मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड होणार; Supreme Court कायद्याची तपासणी करणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) (MMRDA) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो (Mumbai Metro) प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ मार्गिका १८.६ किमी लांबीची असून यात १७ स्थानकांचा समावेश आहे. तर ‘मेट्रो ७’ मार्गिका १६.५ किमी लांबीची असून यावर एकूण १३ स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल आणि या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या.

हेही वाचा-Jagtik Marathi Sammelan : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांची संख्या घटली; जागतिक मराठी संमेलनातील सूर

या दोन्ही मार्गिकांना आता हळहळू मुंबईकरांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. आजघडीला या दोन्ही मार्गिकांवरून अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. आतापर्यंत या मार्गिकांवरून १५ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. अतिवेगवान आणि सुकर, सुरक्षित प्रवासामुळे मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळते. आता या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या आणखी सुसाट धावणार आहेत. (Mumbai Metro)

हेही वाचा-  Torres Scam : ६ महिन्याच्या पर्यटक व्हिसावर आलेल्या युक्रेनच्या नागरिकांनी लुटले हजार कोटी

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील मेट्रो संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानुसार या दोन्ही मार्गिकांवर ताशी ५० ते ६० किमी वेगाने मेट्रो गाड्या धावत आहेत. ‘एमएमआरडीए’कडून सर्व नियम-अटींची पूर्तता करून मेट्रोचे संचलन करण्यात येत आहे. आता या मार्गिकांसाठी नियमित संचलनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती ‘एमएमआरडीए’कडून देण्यात आली. हे प्रमाणपत्र मिळाल्याने आता या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या ताशी ५० ते ६० किमीऐवजी ताशी ८० किमी वेगाने धावणार आहेत. मेट्रो गाड्यांचा वेग आता वाढणार असल्याने प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब आहे. यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्याचीही शक्यता आहे. (Mumbai Metro)

हेही वाचा- Mumbai Naws : मालाड मीठ चौकी जोडमार्गावर उड्डाणपूल वाहतुकीस खुला

मुंबईकरांना शाश्वत, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिकांना नियमित संचलनासाठी प्रमाणपत्र मिळणे ही एक मोठी उपलब्धी असून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्यादृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर हे प्रमाणपत्र म्हणजे ‘एमएमआरडीए’च्या वचनबद्धतेचा दाखला असल्याचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सीसीआरएसकडून मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे आता मेट्रो गाड्यांचा वेग वाढेल, असा विश्वास महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला. (Mumbai Metro)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.