मुंबई-पुणेदरम्यान (Mumbai-Pune) रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-पुणेदरम्यान १९२ किमीचे अंतर असून, या मार्गावर एकूण ४४ रेल्वेगाड्या धावतात. त्यापैकी २३ रेल्वेगाड्या रोज धावणाऱ्या असून उर्वरित रेल्वेगाड्या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि त्रैसाप्ताहिक स्वरूपात आहे. त्यामुळे आता मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास आणखी वेगवान होण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन प्रस्ताव तयार केला आहे.
नव्या मार्गावर मेल-एक्स्प्रेसचा वेग दुप्पट
कर्जत ते तळेगाव (७२ किमी) आणि कर्जत ते कामशेत (६२ किमी) हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. नव्या मार्गामुळे लोणावळा टाळून रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल-एक्स्प्रेसचा वेग दुप्पट होईल, शिवाय नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्यायही खुला होणार आहे. मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे मार्गात लोणावळा-खंडाळा घाट आहे. प्रवासी सुरक्षिततेमुळे घाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा मेल-एक्स्प्रेसला आहे. नव्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वेगाड्या ताशी ११० किमी वेगाने धावू शकणार आहेत. दोन्ही मार्गांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यावर त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Mumbai-Pune)
अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही
कर्जत ते तळेगावदरम्यान ७२ किमीच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रेडियंट (चढ-उताराची तीव्रता) १.१०० होणार आहे. सध्या लोणावळा घाटात १.३७ ग्रेडिएंट होणार आहे. यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. कर्जत ते तळेगाव अंतर ५७ किमी असून, नव्या मार्गात अंतर ७२ किमीपर्यंत पोहोचेल, कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या ४४ किमी असून, नव्या मार्गानुसार ६२ किमी असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्याने नव्या मार्गात अंतर अधिक आहे. (Mumbai-Pune)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community