शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) रविवारी (३० मार्च) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाईट लँडिंग’ सेवेची सुरुवात झाली असून यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे शिर्डी व परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळू शकते. (Shirdi Airport)
हेही वाचा-“…तर देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा” ; Raj Thackeray काय म्हणाले ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून म्हटलं आहे की, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) हैदराबादहून आलेल्या इंडिगो विमानाचं स्वागत केलं. हैदराबादहून सुटलेलं इंडिगो विमान रात्री ९.३१ वाजता शिर्डीच्या विमानतळावर उतरलं. यावेळी एमएडीसीने विमानातील प्रवाशांचं स्वागत केलं. हे नाइट लँडिंग महाराष्ट्राच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांसाठी सोयी आणि जगभरातील श्री साई बाबा भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी ही घटना आहे. (Shirdi Airport)
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील याबाबत एक पोस्ट करून माहिती दिली आहे. मोहोळ यांनी एक्सवर म्हटलं आहे की “शिर्डी विमानतळावर आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाईट लँडिंग’ सेवेचा प्रारंभ झाला असून यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. शिवाय शिर्डी आणि परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार असून याचाच सकारात्मक परिणाम या भागाच्या अर्थकारणावर देखील होणार आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळावरील ‘नाईट लॅंडिंग’ सुरू होणे, हा केवळ शिर्डीसाठीच नाही तर अहिल्यानगर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठीही एक महत्त्वाचा टप्पा आहे.” (Shirdi Airport)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community