ओमान येथील सलाम एअरलाईन्सच्या विमानाचे बुधवारी रात्री नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बांगलादेशच्या चातगावहून मस्कतला जाणाऱ्या या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान आपात्कालीन परिस्थितीत नागपुरात लँड करावे लागले. या विमानातील सर्व २०० प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलाम एअरलाईनच्या विमानाचे बुधवारी, १ मार्चला रात्री नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाला विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे आढळून आले होते. हे विमान बांगलादेशातील चातगाव येथून मस्कतला जात होते. विमान भारतीय हवाई हद्दीत असताना त्याच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे आढळले. त्यानंतर विमान नागपूर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. विमानतळ कर्मचाऱ्यांनीही वेळेत सर्व तयारी केली आणि विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे.
(हेही वाचा – लँडिंगपूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community