पश्चिम रेल्वेच्या (Western Railway Accident) पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात (Palghar Railway Accident) झाल्याची घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. तरीही पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक पूर्व पश्चिम प्रवास करत आहेत. पालघरच्या हनुमान मंदिर चौक (Hanuman Mandir Chowk) येथील बंद रेल्वे फाटका जवळ भीषण अपघात झाला आहे. (Palghar Railway Accident)
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला हनुमान मंदिराजवळ बंद असणारे फाटक ओलांडताना रेल्वे खाली येऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला धक्का लागून तो गंभीर जखमी झाला आहे. (Palghar Railway Accident)
नेमकं काय घडलं ?
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमीवर पालघर मधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग व इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतीयारी जिल्ह्यातील तीन तरुण सुट्टी निमित गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते. पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना मुंबईहून जयपुरकडे जाणारी जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस उपनगरीय गाडी आल्याने दोन रुळाच्या मध्ये असणाऱ्या जागेत तिघांपैकी दोघे थांबून राहिले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Palghar Railway Accident)
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पालघरच्या माजी नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारी यांनी दिली आहे. या तिघांपैकी एक तरुण लघुशंखेसाठी बाजूला गेल्याने तो या अपघातात जखमी झाला आहे. (Palghar Railway Accident)
अपघातातील मृतांची नावे (Palghar Railway Accident)
सोनू राम (35)
मोनू कुमार (19)
जखमी
अनुप पंडित (20)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community