Z Morh Tunnel Inauguration : पंतप्रधान मोदींनी केले झेड मोड बोगद्याचे उद्घाटन; १ तासाचे अंतर १५ मिनिटांत कापता येणार

66
Z Morh Tunnel Inauguration : पंतप्रधान मोदींनी केले झेड मोड बोगद्याचे उद्घाटन; १ तासाचे अंतर १५ मिनिटांत कापता येणार
Z Morh Tunnel Inauguration : पंतप्रधान मोदींनी केले झेड मोड बोगद्याचे उद्घाटन; १ तासाचे अंतर १५ मिनिटांत कापता येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी (13 जानेवारी) श्रीनगर-लेह महामार्गावरील (Srinagar-Leh Highway) एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प असलेल्या सोनमर्ग झेड-मोर बोगद्याचे (Z Morh Tunnel Inauguration) उद्घाटन केले. श्रीनगर-लेह महामार्ग NH-1 वर बांधलेला 6.4 किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग 6 महिने बंद असतो. बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व ऋतुत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. (Z Morh Tunnel Inauguration)

पूर्वी श्रीनगर-लेह महामार्गावरील गगनगीर ते सोनमर्ग दरम्यान 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असे. या बोगद्यामुळे हे अंतर आता 15 मिनिटांत कापता येणार आहे. याशिवाय, वाहनांचा वेग 30 किमी/तास वरून 70 किमी/ताशी वाढेल. पूर्वी हा दुर्गम डोंगराळ भाग पार करण्यासाठी 3 ते 4 तास लागत होते. आता हे अंतर अवघ्या 45 मिनिटांत कापले जाणार आहे. (Z Morh Tunnel Inauguration)

पर्यटनाबरोबरच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे लष्कराला लडाखपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. म्हणजेच बर्फवृष्टीदरम्यान लष्कराला हवाई दलाच्या विमानांमध्ये जे सामान वाहून नेणे आवश्यक होते, ते आता कमी खर्चात रस्त्याने वाहून नेणे शक्य होणार आहे. (Z Morh Tunnel Inauguration)

Z मॉड बोगदा 2700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. 2018 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. हा बोगदा 434 किमी लांबीच्या श्रीनगर-कारगिल-लेह महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत 31 बोगदे बांधले जात आहेत, त्यापैकी 20 जम्मू-काश्मीर आणि 11 लडाखमध्ये आहेत. (Z Morh Tunnel Inauguration)

गेल्या वर्षी कामगारांवरही दहशतवादी हल्ला
20 ऑक्टोबर 2024 रोजी दहशतवाद्यांनी बोगद्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. दोन दहशतवाद्यांनी गगनगीर येथील लेबर कॅम्पमध्ये घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात बोगदा बांधणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या 6 कामगारांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एका स्थानिक डॉक्टरचाही मृत्यू झाला होता. (Z Morh Tunnel Inauguration)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.