पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही देशातील आठवी वंदे भारत ट्रेन आहे. शनिवारपासून या ट्रेनच्या तिकीट विक्रीला सुरूवात झाली असून सोमवारपासून नियमित सेवा सुरू होणार आहे.
( हेही वाचा : नेपाळमध्ये भीषण अपघात! ७२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले)
देशाला मिळाली आठवी वंदे भारत!
आठव्या वंदे भारत ट्रेनमध्ये १४ एसी चेअर कार आणि दोन एक्झिक्युटिव्ह एसी चेअर बोगी असतील. या ट्रेनमधून १ हजार १२८ प्रवासी प्रवास करू शकतात अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेकडून सेवेत दाखल होणारी ही आठवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली गाडी असून सुमारे 700 किमी अंतर पार करेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबेल. स्वदेशात निर्मिती करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना जलद, आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देईल. या ट्रेनमुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल तसेच देवदर्शन सुद्धा आणखी सुलभ होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community