Punjab Accident News : ओव्हरस्पीड बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 24 हून अधिक जखमी

81
Punjab Accident News : ओव्हरस्पीड बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 24 हून अधिक जखमी
Punjab Accident News : ओव्हरस्पीड बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 24 हून अधिक जखमी

पंजाबमधील (Punjab Accident News) भटिंडा (Bathinda) जिल्ह्यातील तलवंडी साबो येथे शुक्रवारी (27 डिसेंबर) ओव्हरस्पीड बसचा (Overspeeding bus) भीषण अपघात झाला. खासगी कंपनीची बस (पीबी 11 डीबी- 6631) नियंत्रणाबाहेर गेली आणि नाल्यात पडली. यामध्ये चालकासह 8 जणांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 2 वर्षांची मुलगी आणि तिच्या आईचाही समावेश आहे. (Punjab Accident News)

हेही वाचा-Himachal Snowfall: हिमाचलमध्ये बर्फवृष्टी पाहण्यासाठी 48 तासांत 80 हजार वाहनांतून आले 3 लाख पर्यटक

हरियाणाचा रहिवासी असलेल्या एका अपंग व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. बलकार सिंग असे मृत चालकाचे नाव असून तो मानसा येथील रहिवासी आहे. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जीवन सिंग वाला गावाजवळ हा अपघात झाला. बस सरदुलगडहून भटिंडाच्या दिशेने जात होती. बसमध्ये सुमारे 50 लोक होते. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. (Punjab Accident News)

हेही वाचा-Palghar Railway Accident : पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर

भटिंडाचे डीसी शौकत अहमद पारे यांनी सांगितले की, बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, ड्रायव्हर वेगात बस चालवत होता. तेवढ्यात समोरून एक मोठी ट्रॉली आली. ते टाळण्यासाठी बसने वळण घेतल्याने हा अपघात झाला. यानंतर बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये आरडाओरडा झाला. माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. याबाबत त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली. (Punjab Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.