मध्य रेल्वे, मुंबई विभाग, कर्नाक आरओबी (Karnak ROB) (टप्पा-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सच्या समायोजनासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण विभागातील किमी ०/१-२ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद स्थानकांदरम्यान (Masjid Station) दि. २७ जानेवारी आणि २८ जानेवारी रोजी विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. दि. २७ जानेवारी आणि २८ जानेवारी रोजी मध्यरात्री रोजी ००.३० वाजल्यापासून ते ०४.०० वाजेपर्यंत (३.३० तास) भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर (दोन्ही स्टेशन वगळून) असेल. तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर – वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) दरम्यान (दोन्ही स्थानके वगळून) हा विशेष ब्लॉक असेल. (Railway Update)
रेल्वे वाहतुकीवर होणारे परिणाम – ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन:
ब्लॉक काळात मुख्य मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.(Railway Update)
मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा कल्याण (Kalyan), ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांवर संपतील/सुटतील.
हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्टेशनवर संपतील/सुटतील.
मुख्य मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती:
कर्जतसाठी डाऊन धीमी मार्गावर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०२.३३ वाजता पोहोचेल.
अप धीम्या मार्गावर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता – डोंबिवली येथून २२.४८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ००.१० वाजता पोहोचेल.
मुख्य मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती:
डाऊन धीमी मार्गावर – कर्जतसाठी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.४७ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०७.०८ वाजता पोहोचेल.
अप धीम्या मार्गावर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणसाठी ०३.२३ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५६ वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती:
पनवेलसाठी डाऊन मार्गावर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०१.३३ वाजता पोहोचेल.
अप मार्गावर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पनवेल येथून २२.४६ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ००.०५ वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती:
डाऊन मार्गावर – पनवेलसाठी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०६.१२ वाजता पोहचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप मार्गावर – वांद्रे टर्मिनस येथून ०४.१७ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४८ वाजता पोहचेल.
दादर येथे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचा अल्पकालीन स्थगिती:
१. 12052 मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २७.०१.२०२५ रोजी सुटलेली
२. 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २६.०१.२०२५ रोजी सुटलेली
३. 22120 मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस दि. २७.०१.२०२५ रोजी सुटलेली
४. 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस दि. २६.०१.२०२५ रोजी सुटलेली.
हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती आहे की रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community