नवी मुंबई-अलिबाग अंतर ४० किमीने होणार कमी; वेळचीही होणार बचत

187

निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगराशी जोडण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित रेवस रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते उरणनजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पूल बांधण्यासाठी अखेर निविदा मागविल्या आहेत.

(हेही वाचा – आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; 4 ठार, 45 हून अधिक जण जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, या पुलामुळे नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. इतकेच नाहीतर वेळ आणि इंधानाची बचतही होण्यासही मदत होणार आहे. रस्ते विकास महामंडळ या पुलावर ८९७ कोटी ७० लाख खर्च करणार आहे. खाडी पूल बांधण्यासाठी रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी निविदा मागविल्या होत्या.

पावसाळ्यातील समस्या सुटणार

रेवस- कारंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यात दोन तासांचा अवधी लागतो. तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. मात्र, पावसाळ्यात फेरीसेवा बंद असल्याने प्रवास करणे कठीण असल्याने हा पूल महत्त्वाचा मानला जात आहे.

नवी मुंबई विमानतळ – जेएनपीटीला जोडणार

या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे. यात अलिबाग आणि नवी मुंबई व मुंबईचे अंतर कमी होऊन यात प्रवाशांचा वेळ, पैसा, श्रम याच्यासह प्रदूषण कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे.

वन मंत्रालयाची परवानगी आवश्यक

प्रकल्पासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. ती मिळाल्यावर काम सुरु होणे अपेक्षित असून, ते सुरु पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.