Thane येथे देशातील पहिली दिव्यांगांसाठीची ‘सुगम्य सिग्नल यंत्रणा’ कार्यरत

50
Thane येथे देशातील पहिली दिव्यांगांसाठीची 'सुगम्य सिग्नल यंत्रणा' कार्यरत
Thane येथे देशातील पहिली दिव्यांगांसाठीची 'सुगम्य सिग्नल यंत्रणा' कार्यरत

ठाणे (Thane) येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या तीन हात नाका परिसरात अंध आणि अपंगांना रस्ता ओलांडता यावा यासाठी ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) सुगम्य सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे. यात पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरु झाल्यास अंध- अपंगांना आवाज ऐकू जाईल. त्यानुसार त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत होईल. हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जाते. एक ते दोन आठवड्यांत ही सिग्नल यंत्रणा (Signal system) कार्यान्वित होईल, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. (Thane)

( हेही वाचा : Congress CWC Meeting : काँग्रेसच्या पोस्टरवर भारताच्या नकाशातून पीओके गायब; काश्मीरशी पुन्हा केला द्रोह

तीन हात नाका चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात शासकीय आस्थापनात तसेच खासगी कार्यालयात काम करणाऱ्या अंध-अपंग नोकदारांना रस्ता ओलांडताना सहप्रवाशांवर अवलंबून राहावे लागते. यात काही वेळाला अपघात होण्याची शक्यता असते.त्यामुळे सहप्रवाशांवर अवलंबून न राहता अंध-अपंगांना प्रवास करता यावा, यासाठी ही सोय उपल्बध करून देण्यात आली आहे. (Thane)

देशभरात सर्वत्र रेल्वेगाड्यांमध्ये ज्यापद्धतीने अपंगांसाठी यंत्रणा असते. त्याचप्रमाणे ठाण्यात यंत्रणा बसवण्यात आली आहे. अंध- अपंग व्यक्ती थांबा रेषेजवळ आल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगजवळ (Zebra crossing) पाय ठेवताच, त्याला विशिष्ट आवाजाद्वारे सिग्नल पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद आहे की सुरु याची माहिती मिळेल. अंपगांनाही सिग्नलजवळ चढ-उतार उपल्बध असेल. शिवाय चौकात अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील फलक लावले जातील. (Thane)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.