ST Corporation President : आता प्रताप सरनाईक नाही तर ‘हे’ असतील एसटी महामंडळाचे अध्यक्ष

81
ST Corporation President : आता प्रताप सरनाईक नाही तर 'हे' असतील एसटी महामंडळाचे अध्यक्ष
ST Corporation President : आता प्रताप सरनाईक नाही तर 'हे' असतील एसटी महामंडळाचे अध्यक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची उचलबांगडी केली आहे. परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष (ST Corporation President) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता संजय सेठी (Sanjay Sethi) हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतील.

हेही वाचा-Konkan Railway : कोकणातील रेल्वेगाड्या आता दादरपर्यंत धावणार ; काय आहे कारण ?

गृह मंत्रालयाने राजपत्र जारी करत परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय जारी केला. आतापर्यंत परिवहन मंत्री हेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. मात्र काही काळापूर्वी त्यात बदल करत भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना मंत्रिपद नसतानाही एसटी महामंडळाचे अध्यक्ष (ST Corporation President) करण्यात आले होते. परंतु आता सरनाईकांना एसटीचं अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा असतानाही त्यात बदल करण्यात आले आहेत. (ST Corporation President)

हेही वाचा-Ayodhya Ram Mandir: सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत रामलल्लाचे दर्शन घेता येणार, मंदिर ट्रस्टचा निर्णय

यापुढे परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिवच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळतील. त्यानुसार सध्या संजय सेठी यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. परंतु हा सरनाईकांसाठी राज्य सरकारकडून मोठा धक्का मानला जातो. (ST Corporation President)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.