एसटी (ST) महामंडळाने भाडेवाढ (ST Ticket Hike) करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. (ST Ticket Hike)
हेही वाचा- Kashmiri Hindu महिलांचा ‘विस्थापित’ दर्जा राहणार का? उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येत आहे. दरवाढीचा हाच टक्का कायम ठेवल्यास आज असलेल्या १०० रुपयांच्या तिकिटामागे १५ रुपये जादा मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. (ST Ticket Hike)
हेही वाचा- VIP Number Plate : पसंतीच्या क्रमांकासाठी नको चक्कर; ॲपवर मिळवा व्हीआयपी नंबर !
यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीट दरवाढ झाली होती. आता सुरुवातीला १२.३६ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे महामंडळाच्या वाहतूक विभागाने पाठविला होता. या प्रस्तावावर महामंडळ स्तरावर खलबते झाल्यानंतर त्यात वाढ करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा प्रस्ताव १४.१३ टक्के एवढा करण्यात आला आहे. शासन १२.३६ ला की १४.१३ टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देते की यातून दुसरा मार्ग काढला जातो, याकडे लक्ष असेल. (ST Ticket Hike)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community