ST कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामात विशेष वाहतूक; लांब पल्ल्यासाठी दररोज ७६४ जादा फेऱ्या

80
ST कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामात विशेष वाहतूक; लांब पल्ल्यासाठी दररोज ७६४ जादा फेऱ्या
ST कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामात विशेष वाहतूक; लांब पल्ल्यासाठी दररोज ७६४ जादा फेऱ्या

उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची वाढणारी मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) यंदाही जादा वाहतूक सेवेचे नियोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणेच १५ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या कालावधीत लांब पल्ल्याच्या ७६४ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार असून या सर्व फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टीदरम्यान अनेक प्रवासी आपल्या गावी जात असल्याने एसटीच्या (ST) लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर महामंडळाने स्थानिक शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त लांब पल्ल्याच्या बससेवा (Bus) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, शालेय फेऱ्या रद्द करून त्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गांवर तैनात केल्या जाणार आहेत.

(हेही वाचा – 30 एप्रिलपासून Chardham Yatra सुरू ; ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!)

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यभरातील विविध मार्गांसाठी या जादा फेऱ्यांना मंजुरी दिली असून दररोज ५२१ बसेसच्या माध्यमातून सुमारे २.५० लाख किलोमीटर अंतर कापले जाणार आहे. या विशेष बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार असून १५ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

महत्वाचे म्हणजे, उन्हाळी जादा फेऱ्यांचे तिकीट आरक्षण संगणकीय पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना एसटीच्या (ST) अधिकृत वेबसाईटवर (www.msrtc.maharashtra.gov.in) तसेच (npublic.msrtcors.com) या संकेतस्थळांवर किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करता येईल. तसेच, महामंडळाच्या बसस्थानकांवरील (Corporation Bus Stand) आरक्षण केंद्रांवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांना उन्हाळी सुट्टीतील प्रवासाचे आगाऊ नियोजन करून या विशेष बससेवेचा (Bus) लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.