समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी

120

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ भीषण अपघात झाला आहे. एका खाजगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून झालेल्या या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक हा अपघाता झाला. नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळे बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चार प्रवाशांची प्रकृती गंभीर

या अपघातात बसमधील 30 पैकी 14 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जखमींना बाहेर काढण्यात आले. यापैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातामधील जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी प्रवाशांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. 11 डिसेंबर 2022 पासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहे. साई भक्तांसाठी या मार्गावर एसटी महामंडळातर्फे विशेष बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

(हेही वाचा केंद्र सरकार दिल्ली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता करणार जप्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.