मध्य (Central Railway), पश्चिम रेल्वेवर (Western Railway) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (16 फेब्रु.) मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ पर्यंत असेल. (Mega block)
हेही वाचा-Mahakumbh बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार ; 54 सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध एफआयआर दाखल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. (Mega block)
घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.२९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या ट्रेन्स विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. (Mega block)
हार्बर मार्ग (Harbour Line)
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (Mega block)
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल- वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. (Mega block)
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजता
परिणाम : ब्लॉक कालावधीत गोरेगाव – बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. (Mega block)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community