Air India: एअर इंडियात विलीन होणार ‘या’ 3 विमान कंपन्या

कंपनी लवकरच करणार अधिकृत घोषणा

82

काही दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या एअर इंडिया विमान कंपनीचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठी टाटा सन्सने कंबर कसली आहे. टाटा सन्सने एअरलाइन्स विस्तारा, एअर एशिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या तीन कंपन्यांचे एअर इंडियात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टाटा सन्सचे हे नियोजन यशस्वी झाल्यास एअर इंडिया फ्लीट आणि मार्केट शेअरच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाइन बनेल. सिंगापूर एअरलाइन्स ही टाटा समूहाची भागीदार आहे. टाटा यांनी सिंगापूर एअरलाइन्सशी याबाबत बोलणी सुरू आहे. टाटांनी सिंगापूर एअरलाइन्सशी याबाबत चर्चा केली असून विस्तारा टाटामध्ये विलीन करण्याचे मान्य केले आहे.

(हेही वाचा – हात-पाय मोडेपर्यंत मारले तरी पुन्हा ‘आफताब’सोबत गेली आणि…, शरीराचे 35 तुकडे झालेल्या मुलीच्या हत्येची सत्यकथा)

सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहाच्या विस्तारामध्ये भागीदार आहे आणि या विलीनीकरणानंतर, विस्तारा चालवणारी टाटा सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन होऊ शकते. एअर इंडिया कमी किंमतीत पूर्ण सेवा देणारी विमानसेवा असेल. आठवडाभरात याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. दोन्ही विमान कंपन्या लवकरच व्यावसायिक ऑपरेशन सुरू करू शकतात. पण एक संस्था म्हणून काम सुरू होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो असे सूत्रांनी सांगितले. विस्तारा आणि एअर इंडिया लवकरच व्यावसायिक कामकाज सुरू करू शकतात. मात्र, टाटा सन्स आणि विस्ताराने सध्या यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.