कुर्ला परिसरात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातात सात पादचाऱ्यांचा जीव गेला आणि चाळीसहून अधिक जण जखमी झाले. बस चालकाच्या चुकीमुळे भीषण अपघात झाला होता. बेस्टच्या या अपघाताच्या घटनेनंतर एसटी महामंडळाने (ST Corporation) सावध पवित्रा घेतला आहे. एसटी महामंडळाने प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. पुणे विभागात (Pune Division) अचानक मद्यपान तपासणी मोहिम (Alcohol testing campaign) राबवली जात आहे. (Pune News)
दरम्यान, मद्यपान केलेल्या तीन एसटी चालकांना निलंबित करण्यात आलं आहे, तर तीन जणांची चौकशी लावली आहे. पुणे विभागात स्वारगेट शिवाजीनगर आगारात ही कारवाई सुरू आहे. ब्रेथ एनलायझरद्वारे तपासणी केली. त्यात मद्यपान केलेल्या तीन चालक आढळून आले. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे, तर 3 जणांची चौकशी सुरु आहे. कोणत्याही प्रकारची अघटीत घटना घडू नये म्हणून एसटी महामंडळाने सर्व चालक व वाहक ड्युटीवर असल्यावर त्यांची ब्रेथ एनालायझरद्वारे तपासणी सुरू केली आहे. (Pune News)
हेही वाचा-Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी चीन दौऱ्यावर ; या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार
गेल्या काही दिवसांपासून पुणे विभागातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारासह जिल्ह्यातील सर्व आगारातील चालक आणि वाहकांची ही तपासणी करण्यात आली. त्यावेळी 6 चालकांनी मद्यपान केल्याचे निदर्शनात आले आहे. पुणे विभागातील एसटीच्या विविध आगरातून दररोज 550 तसेच इतर आगरातून सुटणाऱ्या हजारो बसचा थांबा आहे. (Pune News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community