Traffic Fines : दुचाकी चालवणार्‍यांसाठी धोक्याची घंटा! पाळा हे नियम, नाहीतर भरावा लागेल एवढा दंड

47
Traffic Fines : दुचाकी चालवणार्‍यांसाठी धोक्याची घंटा! पाळा हे नियम, नाहीतर भरावा लागेल एवढा दंड
Traffic Fines : दुचाकी चालवणार्‍यांसाठी धोक्याची घंटा! पाळा हे नियम, नाहीतर भरावा लागेल एवढा दंड

मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी (Traffic police) रस्ता सुरक्षा आणि शिस्त सुधारण्यासाठी वाहतूक नियमांच्या उल्लंघनांसाठी नवीन नियमांनुसार दंड लागू केले आहेत. हे नवीन नियम धोकादायक असलेल्या ड्रायव्हिंगच्या पद्धतींना आळा घालतात. तसंच लोक वाहतूक नियमांचे पालन करतील याचीही खात्री करतात. (Traffic Fines)

वेगाने गाडी चालवणं, वैध बाईक विम्याशिवाय बाईक चालवणं, धोकादायक ड्रायव्हिंग, अयोग्य पार्किंग इत्यादी गुन्ह्यांसाठी दंडामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. अगदी पहिल्यांदाच केलेल्या गुन्ह्यांवरही पूर्वी आकारण्यात येत होता त्यापेक्षा जास्त दंड आकारला जाईल.

मुंबई वाहतूक पोलिसांनी (Traffic police) उचललेलं हे पाऊल वाहतूक नियमांच्या उल्लंघनांविरुद्ध एक मजबूत प्रतिबंधक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या (Traffic police) या नियमांमुळे लोकांमध्ये काही प्रमाणात भीती आणि वादविवाद देखील निर्माण झाले आहेत. मुंबईतल्या प्रवाशांना आणखी कडक करण्यात आलेल्या नवीन वाहतूक नियमांबद्दल माहिती देण्यासाठी या लेखामध्ये काही प्रमुख गुन्ह्यांचा आणि त्यासाठी लागू असलेल्या दंडांचा आढावा घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – Nashik Airport : देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरू होणार)

महाराष्ट्रातील दुचाकी वाहनांसाठी महत्वाचे वाहतूक नियम

दुचाकी चालवणं सोयीचं आहे पण त्यासाठी चालकाने स्वतःच्या जबाबदाऱ्या देखील पाळायला हव्यात. पुढे काही महत्त्वाचे नियम आहेत जे दुचाकीस्वाराने पाळायला हवेत…

हेल्मेट घालणे

दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीने नेहमीच हेल्मेट (Helmet) घालावं. हेल्मेट न घातल्यास ₹१,००० दंड होऊ शकतो.

तिहेरी प्रवास टाळावा

दुचाकी वाहनावर स्वाराव्यतिरिक्त एकापेक्षा जास्त व्यक्तीने मागे बसणं बेकायदेशीर आणि धोकादायक आहे. तिहेरी प्रवास केला तर ₹१,००० एवढा दंड आकारण्यात येईल.

वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा

दुचाकीवर स्वारी करताना मोबाईल फोन वापरणं हे फक्त धोकादायकच नाही, तर बेकायदेशीरही आहे. या गुन्ह्यासाठी पहिल्या प्रकरणात ₹५,००० एवढा दंड आकारण्यात येतो.

वैध वाहनचालक परवाना नसणं

परवाना नसताना गाडी चालवल्यास संबंधित व्यक्तीला ₹५,००० एवढा दंड आकारला जाऊ शकतो. म्हणूनच तुमचा परवाना नेहमीच अद्ययावत आणि तुम्ही चालवत असलेल्या वाहनासाठी वैध असल्याची खात्री करा.

गाडीची वेगमर्यादा ओलांडून गाडी चालवणं

दुचाकी वाहनांसाठी वेगमर्यादा ओलांडून गाडी चालवल्यास, हलक्या मोटार वाहनांसाठी ₹१,००० आणि जड वाहनांसाठी ₹२,००० एवढा दंड आकारला जातो.

(हेही वाचा – Prashant Koratkar ची रवानगी कळंबा जेलमध्ये; पुढील सुनावणी १ एप्रिलला होणार)

महाराष्ट्र वाहतूक दंड – दुचाकींसाठी..

महाराष्ट्रात, दुचाकीशी संबंधित गुन्ह्यांसाठी हेल्मेट (Helmet) न घालल्यास ₹१,०००, तिहेरी बाईक चालवल्यास ₹१,००० आणि पार्किंग उल्लंघनासाठी ₹५०० ते ₹१,५०० दंड आकारला जातो. याव्यतिरिक्त, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास ₹१०,००० एवढा दंड आकारला जातो.

मुंबईतल्या दुचाकी चालकांसाठी वाहतूक नियम
  • दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घाला. दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने मुंबईत मोठा दंड भरावा लागतो.
  • मादक पदार्थांच्या प्रभावाखाली दुचाकी चालवू नका. तसं केलं तर गंभीर अपघात आणि मृत्यूही होऊ शकतात. हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवल्यास दंड आणि कठोर शिक्षा होऊ शकते.
  • आक्रमकपणे दुचाकी चालवू नका. जास्त वेगाने गाडी चालवू नका किंवा रस्त्यावरच्या शर्यतीत सहभागी होऊ नका. तसं केलं तर तुमचा आणि रस्त्यावर असणाऱ्या इतर लोकांचेही जीव धोक्यात येऊ शकतात. या नियमाचं उल्लंघन केलं तर मुंबईमध्ये मोठा वाहतूक दंड होऊ शकतो.
  • दुचाकीवर दोनपेक्षा जास्त स्वार असल्यास दंड आकारण्यात येईल.
  • दुचाकी चालवताना सर्व अनिवार्य कागदपत्रे सोबत ठेवा. अधिकाऱ्यांकडून तपासणी झाली तर तुम्ही ती कागदपत्रे दाखवू शकता. तसं न केल्यास मुंबईत वाहतूक दंड होऊ शकतो. उदा. जर तुमच्याकडे प्रदूषण प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला पीयूसी दंड होऊ शकतो.
  • वाहतूक सिग्नलच्या नियमांचा नेहमीच आदर करा आणि नियमांचं पालन करा. वाहतूक सिग्नलच्या नियमांचं उल्लंघन करणं हे धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतात. या नियमांचं उल्लंघन केलं तर सिग्नल जंपिंग दंड होऊ शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.