Vaitarna- Miraroad रेल्वे अपघातात वाढ; वर्षभरात २२५ जणांचा अपघाती मृत्यू

48
Vaitarna- Miraroad रेल्वे अपघातात वाढ; वर्षभरात २२५ जणांचा अपघाती मृत्यू
Vaitarna- Miraroad रेल्वे अपघातात वाढ; वर्षभरात २२५ जणांचा अपघाती मृत्यू

रेल्वे (Railway) प्रवास दिवसेंदिवस धोकायदायक ठरू लागले आहेत. २०२४ या वर्षात वैतरणा ते मिरारोड (Vaitarna- Miraroad)रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे प्रवासात २२५ जणांचा बळी गेला असून २१२ जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे अपघातातील बळींच्या संकेत वाढ झाल्याचे ही दिसते. सन २०२३ साली अपघातात २०४ जणांचा बळी गेला असून १६७ गंभीररित्या जखमी झाले आहेत. (Vaitarna- Miraroad)

( हेही वाचा : Mahakumbh च्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा सांगणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

दरम्यान वसई पश्चिम रेल्वे (Vasai Western Railway) लोहमार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. पश्चिम रेल्वे लोहमार्गावरून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. वाढलेली प्रवासी संख्या आणि बऱ्याचदा प्रवासात हलगर्जीपणा केल्याने प्रवाशांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागले आहे. यात प्रवासात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवणे हे रेल्वे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान असते. (Vaitarna- Miraroad)

रेल्वे अपघातात बऱ्याचदा जीव धोक्यात घालून प्रवासी रुळ ओलांडत असताना घडतात. तसेच कधी गाडीच्या दरवाज्यात लटकत प्रवास करणे धोक्याचे ठरते. त्यामुळेच बरेचसे मृत्यू होतात. ठिकठिकाणी रेल्वे प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी स्कॉयवॉक उभारण्यात आले आहेत. मात्र प्रवासी त्याचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडून फलाटावर जातात. अशा प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलातर्फे कारवाई ही केली जाते. (Vaitarna- Miraroad)

त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचना समजून घेऊन सहकार्य केले पाहिजे. लोकलचे दरवाजे बंद झाले तर अपघाताच्या घटनांना आळा घातला जाऊ शकतो. मात्र प्रवासी त्याचा विचार करत नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच वैतरणा ते मिरारोड रेल्वे स्थानकादरम्यान वाढत चाललेला मृत्यूचा तांडव थांबवण्यासाठी अधिक परिणामकारक उपाययोजना भविष्यात रेल्वे प्रशासनाला कराव्या लागतील. (Vaitarna- Miraroad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.