वंदे भारत, तेजस आणि भारत गौरव! रेल्वेच्या या लक्झरी ट्रेन्सची काय आहेत वैशिष्ट्ये?

105

भारतीय रेल्वेमार्फत नवी दिल्लीतून 3 तर मुंबई सेन्ट्रल आणि चेन्नई येथून प्रत्येकी एक अशा पाच वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत. तसेच चेन्नई एग्मोर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लखनऊ आणि मुंबई सेन्ट्रल इथून प्रत्येकी एक अशा चार तेजस एक्सप्रेस विविध मार्गावर धावत आहेत. 2022-23 या वर्षात (30 नोव्हेंबर 2022 पर्यंत) भारत गौरव ट्रेनच्या 26 व्यावसायिक फेऱ्या भारतीय रेल्वेने चालवल्या आहेत. अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे.

( हेही वाचा : महापालिकेच्या सॅप प्रणालीच्या वार्षिक देखभालीवर २६ कोटींचा खर्च )

वंदे भारत, भारत गौरव व तेजस एक्स्प्रेसची वैशिष्ट्य

वंदे भारत एक्स्प्रेस, ट्रेन जलद सेवा प्रदान करते. ऑनबोर्ड इन्फोटेनमेंट, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आधारित प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित सरकते दरवाजे, मागे घेता येण्याजोगे फ़ूटस्टेप्स , झिरो डिस्चार्ज व्हॅक्यूम बायो टॉयलेट यासारख्या अत्याधुनिक अद्ययावत वैशिष्ट्यांनी ही रेल्वेगाडी सज्ज आहे.

तेजस एक्स्प्रेसमध्ये स्वयंचलित प्रवेशद्वार, प्रवासी माहिती प्रणाली, आग आणि धूर झाल्यास ते दर्शवणारी यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे यासह तेजस एक्स्प्रेसचे डबे आधुनिक आहेत.

पर्यटन सर्किट ट्रेन्सच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणांचे भारतातील आणि जगातील लोकांना दर्शन घडवणे हे भारत गौरव ट्रेनचे उद्दिष्ट आहे.

भारत गौरव सेवा

एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत भारत गौरव ट्रेन्सच्या 26 व्यावसायिक फेऱ्या भारत गौरव ट्रेन्स योजनेअंतर्गत चालवण्यात आल्या आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस या सेवांसह नवीन गाड्यांची ओळख कृती व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता, रहदारीची पद्धत, मागणी इत्यादींवर अवलंबून आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.