पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर जम्बो ब्लॉक (jumbo mega block) असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुरती वाट लागली आहे. पश्चिम रेल्वेने २४, २५ व २६ जानेवारी रोजी जम्बो मेगा ब्लॉक घेतला असून या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. चर्चगेट (Churchgate) लोकल अंधेरी (Andheri), बोरीवली (Borivali) पर्यंत धावत असल्याने या स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी सध्या पहायला मिळत आहे. (Western Railway)
सकाळी सात वाजेपर्यंत लोकल सेवा पूर्ववत होईल असं रेल्वेने अधिकृतपणे सांगितलं होतं. परंतु, साडेसात वाजल्यानंतरही रेल्वे सेवा पूर्ववत झाली नाही. त्यामुळे अंधेरी, बोरीवली या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासूनच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र सकाळी साडेसातनंतरही वाहतूक व्यवस्था पूर्ववत न झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला आहे. (Western Railway)
पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ‘जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास ३३० हून अधिक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे १२७ उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, २४ जानेवारी रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत माहीम व वांद्रे स्थानकादरम्यान जलद गाड्या धिम्या गतीच्या मार्गावरून चालवल्या जात आहेत. अजून दोन दिवस हा जम्बो ब्लॉक चालणार आहे. त्यामुळे उद्या व परवा देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. (Western Railway)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community