डेनिस बार्न्स (Dennis Barnes) हा अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथील एक हुशार विद्यार्थी आहे. त्याने आपल्या पुढच्या शिक्षणासाठी २०० कॉलेजमध्ये अर्ज दाखल केला होता. आणि कमाल म्हणजे आता त्याला १२५ कॉलेजमधून ऑफर आली आहे तसेच त्याला ७३.६८ कोटी रुपयांची (०९ मिलियन डॉलर) स्कॉलरशिप मिळाली आहे.
डेनिसने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले की, तो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहे. डेनिस बार्न्सच्या म्हणण्यानुसार त्याने ऑगस्ट महिन्यात अनेक कॉलेजमध्ये अर्ज दाखल केले होते. त्यानंतर त्याला इतके मेल्स आले की आता त्याचा मेलबॉक्स पूर्णपणे भरलेला आहे.
(हेही वाचा – लाभ घ्या BESTच्या ‘बेस्ट’ योजनेचा आणि वाचवा भरपूर पैसे)
विशेष म्हणजे डिनेस स्पॅनिश भाषेसह इतर अनेक बोलीभाषा बोलू शकतो. याआधी लुइसियाना हायस्कूलच्या एका विद्यार्थ्याने १३० पेक्षा अधिक कॉलेजमध्ये अर्ज भरला होता आणि त्याला ८.७ मिलियन डोलरची स्कॉलरशीप मिळाली होती. तेव्हा त्याचे नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालं होतं.
आता डेनिस बार्न्सने त्या विद्यार्थ्यापेक्षाही खूप मोठे यश मिळवले आहे. आता त्याचे नाव देखील गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केले जाईल. डेनिसने ४.९८ चे जीपीए स्कोअर केला आहे. हा स्कोअर खूपच चांगला मानला जातो. आज डेनिसने अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community