स्त्रीला आपण शक्ती मानतो. या शक्तीने ठरवले तर काय अशक्य आहे? थायरॉइड डिसॉर्डरवर उपचार करण्यासाठी तिने व्यायाम सुरू केला. कारण या आजारात फिटनेस खूप महत्वाचा असतो. पण आजारासाठी सुरू केलेला व्यायाम करिअर कधी झाले हे तिलाही कळले नाही.
उत्तराखंडमध्ये राहणारी प्रतिभा थपलियाल ही बॉडी बिल्डर असून तिने रतमालमध्ये आयोजित केलेल्या नॅशनल वुमेन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकून या क्षेत्रामध्ये आपले नाव कोरले आहे. आता तिला आशिया आणि वर्ल्ड चॅम्पियनवर आपले नाव कोरायचे आहे. त्याची तयार देखील तिने सुरू केली आहे.
प्रतिभा थपलियाल पौडी गढवालच्या आमडी गावची रहिवाशी आहे. लग्नानंतर ती आपल्या पती (भूपेश थपलियाल) आणि दोन मुलांबरोबर देहरादूनच्या धर्मपूरमध्ये राहत आहे. ती दोन मुलांची आई आहे आणि तरी सुद्धा तिने हे यश मिळवले आहे. कारण कर्तृत्वाला वयाची अट नसते हे तिने सिद्ध करुन दाखवलेय. २०१८ रोजी थायरॉइड डोके वर काढत असल्यामुळे डॉक्टरांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचा तिला सल्ला दिला. तिने जिममध्ये जायला सुरुवात केली आणि एका महिन्यातच ३० किलो वजन कमी केले.
(हेही वाचा – एलॉन मस्कची नवीन घोषणा; क्रिएटर्स आणि युजर्सना होणार ‘याचा’ फायदा)
हे खरे पाहता खूप मोठे यश होते. यामध्ये तिचे कष्टही दिसून येतात. तेव्हा पतीने तिची शरीरयष्टी पाहून म्हटले की तू बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घ्यायला हवा. मग तिने आपल्या पतीचे ऐकून बॉडी बिल्डिंगची तयारी सुरू केली. २०२२ मध्ये सिक्किममधील स्पर्धेत तिला चौथा क्रमांक मिळाला. त्यानंतर तिने आपल्यातली कमतरता ओळखली आणि त्यावर मात करायला सुरुवात केली.
आता ४१ वर्षांची आणि दोन मुलांची आई बॉडी बिल्डिंग करणार म्हणजे लोक काही ना काही बोलणारच. आजूबाजूचे लोक टोमणे मारू लागले. पण तिने सर्वांकडे दूर्लक्ष केले. तिच्या घरच्यांनी मात्र तिला पूर्ण सहकार्य केले. आज ती बॉडी बिल्डिंग चॅम्पियन आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community