Health Treatment : अन्ननलिका फुटली, शस्त्रक्रियेसाठी न्युझीलंडहून महिला मुंबईत दाखल 

170
Health Treatment : अन्ननलिका फुटली, शस्त्रक्रियेसाठी न्युझीलंडहून महिला मुंबईत दाखल 
Health Treatment : अन्ननलिका फुटली, शस्त्रक्रियेसाठी न्युझीलंडहून महिला मुंबईत दाखल 
शरीरातील अन्ननलिका फुटल्याने बरेच महिने ट्यूबमधून जेवण घेणाऱ्या महिलेची अखेरीस डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून नवे आयुष्य दिले. अन्ननलिका फुटल्याने चांगले उपचार होण्यासाठी महिलेने न्युझीलंडहून थेट मुंबई गाठली. मुंबईतील खाजगी रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
चुकीच्या उपचारांमुळे अन्ननलिका फुटली
न्यूझीलंड देशाच्या रहिवासी असलेल्या प्रिया कपूर (नाव बदलेले आहे) यांना सात महिन्यांपासून छातीत दुखू लागले. उलट्यांचेही प्रमाण वाढले. न्यूझीलंडमध्येच त्यांनी उपचार सुरू केले. तिथल्या वैद्यकीय तपासणीत महिलेच्या छातीमध्ये पू जमा झाल्याचे चुकीचे निदान झाले. उपचार म्हणून डॉक्टरांनी फुफ्फुस आणि छातीच्या पोकळीतील इतर अवयवांमध्ये छिद्र पाडली. या छिद्रांमुळे अन्ननलिका फुटली. परिणामी महिलेला जास्तच उलट्या होऊ लागल्या. अन्ननलिका फुटल्याने महिलेला ट्यूबमधून जेवण द्यावे लागायचे. महिलेला जगण्यासाठी नवाच संघर्ष सुरू करावा लागला. न्युझीलंडमधील डॉक्टरांच्या वैद्यकीय हलगर्जीपणामुळे तिने जगभरात या उपचारांसाठी चौकशी सुरू केली. अन्ननलिका फुटल्याने तिला बोअरव्हेव्ह सिंड्रॉम या आजाराचे निदान झाले. उपचारांसाठी महिलेले थेट भारतातील मुंबई गाठली. मुंबईतील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉक्टर रॉय पाटणकर यांच्याकडे उपचार सुरू केले. डॉक्टर रॉय पाटणकर यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही पहा – 
https://www.youtube.com/watch?v=9Mmg3Ddo59o
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.