- प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत त्यांनी विविध महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकरी नोंदणी प्रक्रिया वेळेवर पूर्ण करून, ऑक्टोबरमध्येच सोयाबीन खरेदीची तयारी पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारणीचे निर्देश
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्याचा आराखडा तयार करून तो सादर करण्याचे निर्देश दिले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या या ॲग्रो हबमध्ये सर्व आवश्यक सोयीसुविधांचा अंतर्भाव असावा, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – IPL 2025 उद्घाटन आणि सांगता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर, २१ मार्चपासून सुरुवात)
कांदा चाळींना अधिक अनुदान आणि विस्तारावर भर
कांदा साठवणीसाठी चाळी उत्तम पर्याय असल्याचे सांगून या चाळींची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त अनुदान उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महाबाजार आणि बाजार समित्यांचे नियोजन
पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबईत महाबाजार उभारण्याचे नियोजन सादर केले. २००-२५० एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा बाजार प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात बाजार समित्या उभारण्यात येणार असून कोकणात माशांसाठी, तर आदिवासी भागात स्थानिक उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजारपेठा उभारल्या जाणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Z Morh Tunnel Inauguration : पंतप्रधान मोदींनी केले झेड मोड बोगद्याचे उद्घाटन; १ तासाचे अंतर १५ मिनिटांत कापता येणार)
अन्य महत्त्वपूर्ण प्रकल्प
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून पुढील ४५ दिवसांत त्याचे लोकार्पण होणार आहे.
बैठकीला विविध मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित
बैठकीस मंत्री जयकुमार रावल, दादाजी भुसे, शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community