महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची शंका अजूनही कायम आहे. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील. आम्ही सगळे पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. लवकरच आपल्याला याचं उत्तर मिळेल. असं भाजपा नेते तथा देवेंद्र फडणवीस नागपूर येथील पत्रकारांशी बोलत होते. (Devendra Fadnavis)
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत. शिंदे साहेब, मी आणि अजितदादा आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. निवडणुकीच्या पूर्वी ही आम्ही सांगितलं होतं की सर्व निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील. त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार आहे. त्यामुळे कोणाच्याही मनात काहीही किंतु परंतु असेल तर ते ही आज माननीय एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांनी दूर केले आहे.” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
(हेही वाचा – मुंबई महानगरपालिका Uddhav Thackeray यांच्या हातातून जाणार? काय आहे कारण जाणून घ्या!)
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?
एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदा संबंधी आपली भूमिका स्पष्ट केल्या नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेच घेतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community