आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला, त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.
मद्य धोरण घोटळ्या प्रकरणी मनीष सिसोदिया आधीच तुरुंगात
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन ठिकाणी संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या नावाचा उल्लेख आहे. यानंतर आता ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली. मद्य धोरण घोटळ्या प्रकरणी मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मद्य घोटाळ्यामध्ये मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ई़डीने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून सिसोदिया तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 2024 च्या निवडणुका येत आहेत. त्यांना (भाजपा) माहीत आहे की, ते हरणार आहेत आणि हे त्यांचे हताश प्रयत्न आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
(हेही वाचा EDची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community