गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करताना PM Modi म्हणाले, लोकशाही आपल्या डीएनएमध्ये…

118
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय पंतप्रधान म्हणून 56 वर्षात प्रथमच गयानाला (PM Narendra Modi Guyana) भेट दिली. बुधवारी जेव्हा पंतप्रधान मोदी जॉर्जटाउन येथे पोहोचले तेव्हा गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली, पंतप्रधान मार्क अँथनी फिलिप्स आणि कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनालाही संबोधित केले आहे. यावेळी ते म्हणाले की, गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा तुमचा प्रत्येक प्रयत्न जगाच्या विकासाला बळ देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवारी (21 नोव्हेंबर) गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. (PM Modi)
गयानाच्या संसदेच्या विशेष सत्राला (Parliament Special Session) संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जग ज्या परिस्थितीला तोंड देत आहे, त्या परिस्थितीत पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ‘लोकशाही प्रथम (Democracy first) आणि मानवता प्रथम (Humanity first)’. ‘प्रथम लोकशाही’ ही कल्पना आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या विकासासह पुढे जाण्यास शिकवते. तर ‘माणुसकी प्रथम’ ही कल्पना आपल्या निर्णयांची दिशा ठरवते. जेव्हा ‘माणुसकी प्रथम’ या कल्पनेवर आधारित निर्णय घेतले जातात तेव्हा त्याचे परिणाम मानवतेच्या हिताचे असतात. सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी लोकशाहीशिवाय दुसरे कोणतेही माध्यम नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांनी मिळून दाखवून दिले आहे की लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही तर लोकशाही ही आपल्या डीएनएमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या आचरणात आणि वागण्यात असते हे आपण दाखवून दिले आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.   (PM Modi)
भारत आणि गयाना यांनी अशीच गुलामगिरी पाहिली
गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 200-250 वर्षांत भारत आणि गयानाने समान गुलामगिरी, समान संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्यलढ्यात किती लोकांनी बलिदान दिले. आज दोन्ही देश जगात लोकशाही मजबूत करत आहेत.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबईत वाढला महिलांच्या मतदानाचा टक्का)


पीएम मोदींनी आभार मानले
आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, “गयानाच्या ऐतिहासिक संसदेत मला येण्याची संधी दिल्याबद्दल तसेच बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मला गयानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने (Guyana’s highest national award) सन्मानित करण्यात आले. यासाठी मी तुम्हा सर्वांचेही आभार मानू इच्छितो. मी हा पुरस्कार भारतातील लोकांना समर्पित करतो. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.