‘या’ प्रकरणामुळे एअर इंडियाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर आले मोठे संकट

151
एअर इंडिया
'या' प्रकरणामुळे एअर इंडियाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर आले मोठे संकट

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी आधिकारी (सीईओ) कॅम्वेल विल्सन आणि सुरक्षा व गुणवत्ता कार्यप्रमुख हेन्न्री डोनोहो यांच्यावर संकट आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचनालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्रकरण काय?

२७ फेब्रुवारी रोजी दुबई-दिल्ली विमानात एका वैमानिकाने आपल्या मैत्रिणीला कॉकपीटमध्ये प्रवेश दिला होता. या घटनेची तक्रार करण्यात हयगय केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे असे कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

या वैमानिकाने आपल्या मैत्रीणीला कॉकपीटमध्ये प्रवेश दिल्याची तक्रार विमानातील एका क्विन क्रू सदस्याने डीजीसीएकडे केली होती. या घटनेचा अहवाल डीजीएसला वेळेवर न देऊन एअर इंडियाने सुरक्षा निर्देशनाचे उल्लंघन केले. याशिवाय या घटनेच्या तपासातही दिरंगाई करण्यात आली आहे. त्याबद्दल कॅम्वेल विल्सन आणि हेन्न्री डोनोहो यांना २१ एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

(हेही वाचा – Pakistani 14 apps blocks: पाकिस्तानच्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारतात बंदी)

या नोटीशीला उत्तर देण्यासाठी दोन्ही आधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे आधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात एअर इंडियाकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची माहिती विल्सन आणि डोनोहो यांना ३ मार्च रोजी गोपनीय ई-मेलद्वारे देण्यात आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.