उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी २० ऑगस्ट २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग
वेळ : सकाळी१०.२५ ते दुपारी ३. ३५
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी१०.२५ ते दुपारी ३. ३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने अपेक्षित स्थळी पोहोचेल.ठाणे येथून सकाळी १०. ५० ते दुपारी ३. ४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
बोरिवली – भाईंदर अप-डाऊन धीम्या, डाऊन जलद मार्ग
वेळ : रात्री १२.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत
या कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार-वसई रोड ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवसाचा ब्लॉक असणार नाही.
(हेही वाचा :Love Jihad In Nagar : शिकवणीच्या नावाखाली मुसलमान शिक्षिका देते लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धडे)
कुर्ला – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्ग
वेळ : सकाळी ११. १०ते सायंकाळी ४. १०पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०. ३४ ते दुपारी ३. ३६वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर,वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी १०. १६ ते दुपारी ३. ४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल या रद्द करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community