Apple iPhone Series 15 : सप्टेंबरमध्ये लाँच होणार ॲपल १५ सिरीज

Apple iPhone Series 15 : येत्या 13 सप्टेंबरला ॲपलच्या आयफोनची 15 सिरीज लाँच होईल अशी कुजबूज टेक विश्वात सुरू झाली आहे. ॲपलने मात्र अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

128

ॲपल (Apple Inc) कंपनीचा नवीन आयफोन (iPhone Series 15) नेमका कधी बाजारात येणार आणि त्याचे नवीन फिचर्स यांची उत्सुकता खासकरून तरुण पिढीला असतेच असते. कंपनीचा नवीन पिढीचा आयफोन असणार आहे सीरिज 15 आणि तो येत्या 13 सप्टेंबरला कंपनीकडून लाँच होईल अशी एक चर्चा जगभरातच सुरू आहे.

आतापर्यंत कंपनीची सर्व नवीन मॉडेल सप्टेंबर महिन्याच्या मंगळवारी लाँच झाली आहेत. पण, गेल्यावर्षी कंपनीने 14वी सिरीज बाजारात आणताना याच महिन्याचा मधला बुधवार निवडला. त्यामुळे यंदाही ती तारीख 13 सप्टेंबर असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

9to5mac या अॅपलच्या उत्पादनांविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईटवरही हीच तारीख शक्यता म्हणून देण्यात आली आहे. वेबसाईटवर दिलेल्या बातमीनुसार, टेलिफोन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या तारखेला कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहू नये अशी नोटीस काढली आहे. कारण, आयफोन लाँच झाल्यावर एअरटेल, व्होडाफोन सारख्या कंपन्यांना त्यांचे नवे प्लान बाजारात आणायचे असतात. म्हणून ही खबरदारी कंपन्या घेत असतील असा वेबसाईटचा होरा आहे. आणि तिथून 13 सप्टेंबर ही तारीख समोर आली आहे.

(हेही वाचा Maharashtra Session : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन)

ॲपल कंपनी 2020 पासून एका नवीन समस्येशी झुंजत आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवीन मॉडेल लाँच केल्यावर ते जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात कंपनी कमी पडली आहे. कोरोना नंतरच्या काळात चीनमध्ये होणारं आयफोनचं उत्पादन कमी झाल्यामुळे फोनचं बुकिंग होऊनही ग्राहकांना वेळेवर आयफोन मिळत नाहीत अशा तक्रारी आहेत.

त्यानंतर ॲपल कंपनीने पुरवठा साखळी नियमित करण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. चीन ऐवजी आता ॲपल फोनचं उत्पादन इतर कुठल्या देशात होऊ शकेल याचा अभ्यास कंपनी करत आहे. भारतही यातला एक देश आहे.

पण, या देशांमधलं प्रत्यक्ष उत्पादन सुरू व्हायला वेळ लागणार असल्याने यंदाही ग्राहकांना नवीन आयफोन मॉडेल वेळेवर मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी एकदम बुकिंग न घेता ते थोड्या थोड्या कालावधीनंतर आयफोनचं घेण्याचं धोरण कंपनी आखू शकते. खासकरून आयफोन प्रो प्रकारात पुरवठ्याची ही तक्रार जास्त प्रमाणात दिसून आली आहे. आयफोन 14 पर्यंत कंपनीने प्री लाँच ऑर्डर सप्टेंबरमध्येच घेतल्या होत्या. आणि ऑक्टोबरमध्ये फोनचा पुरवठा सुरू केला होता. सध्या नवीन आयफोन १५ बद्दलची उत्सुकता मात्र वाढत चालली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.