भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकले आहात का ?  Ajit Pawar म्हणाले… 

भाजपाच्या ट्रॅफमध्ये अजित पवार अडकले अशी टीका विरोधकांकडून होत असते. या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

297
भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकले आहात का ?  Ajit Pawar म्हणाले... 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar Interview) यांनी बुधवारी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनेक प्रश्नांना त्यांच्या रोखठोक अंदाजात उत्तरं दिली आहेत. अजित पवार मागच्या वर्षी जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झाले. त्यांनी सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय शरद पवारांना पटला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. अजित पवार भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. तसंच सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उमेदवारी का दिली? त्यावरही भाष्य केलं आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला )

या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणले की, “कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. असलं लेचंपेचं काम माझ्याकडे नाही. राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं, सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे. त्यात तसूभर, नखाच्या एवढं ही सत्य नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुलाखतीमध्ये दिली. (Ajit Pawar)

काय म्हणाले अजित पवार?

“भाजपाने सुनेत्रा पवारांचं नाव सुचवलं हे जे काही बोललं जातं आहे त्याला काहीही अर्थ नाही. हा धादांत खोटा प्रचार आहे. जागा वाटप झाल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला परभणीची जागा मिळाली होती. आम्ही ती रासपच्या महादेव जानकरांना दिली. आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. तिथे आधी आम्ही राजेश विटेकरांना तिकिट देणार होतो. मात्र राजकारणात दोन पावलं-मागे पुढे घ्यावी लागतात.” असं उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी टीव्ही ९ मराठीला बुधवारी मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी हे भाष्य केलं. (Ajit Pawar)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

“निवडणूक म्हटल्यावर यश अपयश असतं. आमच्या घरात आजच झालेलं नाही. फार पूर्वी वसंतदादा पवार (VasantDada Pawar) हे आमचे थोरले काका… आमचं अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं नवीन पिढीला माहीत नाही. नवीन बारामतीकरांना माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. तेव्हा एकटे पवार (Sharad Pawar) साहेब काँग्रेससाठी काम करत होते. अख्खं घराणं आजी आजोबा, सर्व त्यांची मुली, मुलं सर्व मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. ही इतिहासाची नोंद आहे. १९६२चा काळ होता”, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.