Tree Plantation: आरोग्य विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम

पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात करण्यात आले वृक्षारोपण

123
Tree Plantation: आरोग्य विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम
Tree Plantation: आरोग्य विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम

स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनामित्त आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड (Tree Plantation) करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिकचे रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर, रोटरी क्बल ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा संगिता लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण Tree Plantationकरण्यात आली आहे. ग्रीन कॅम्पस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ आवारात औषधी व फुलझाडे प्रकारातील रोपांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन, आरोग्याची काळजी व सर्वांना शिक्षण याकरीता संकल्प व त्याचा अवलंब करावा. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांनी पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : Ajit Pawar :अजित पवार गट राज्यभरात ताकद वाढवणार)

विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सागितले की, ’ग्रीन कॅम्पस’ उपक्रमातंर्गत विद्यापीठ आवारात अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते तीनशेपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी सकारत्मकतेने काम करावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ गोदावरीचे प्रकल्प अधिकारी मधुकर गायकवाड, हुकूमचंद पाकळे, अध्यक्षा श्रीमती संगिता लोढा यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे समन्वयन विद्यापीठाच्या हरित कक्षाचे प्रमुख तथा उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने संख्येने सहभागी झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.