Crime : पोलीस हवालदाराने केली अंमली पदार्थाची तस्करी, वाचा नेमकं प्रकरण काय ?

या पोलीस हवालदाराविरोधात एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता

108
Crime : पोलीस हवालदाराने केली अंमली पदार्थाची तस्करी, वाचा नेमकं प्रकरण काय ?
Crime : पोलीस हवालदाराने केली अंमली पदार्थाची तस्करी, वाचा नेमकं प्रकरण काय ?

आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील (Arthur Road Central Jail) एका पोलीस हवालदाराला कारागृहात कैद्यांना ड्रग्ज तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या येरवडा कारागृहात अंमली पदार्थांची तस्करी (Crime) केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात तस्करी झाल्यााची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी विवेक नाईक या पोलीस हवालदाराला (Police constable Vivek Naik) कारागृहात ७१ ग्रॅम चरसची तस्करी करताना पकडले आहे. या पोलीस हवालदाराविरोधात एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये या हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा- BJP : भाजपाला हवी बारामती !)

पोलीस हवालदार विवेक नाईक याला आर्थर रोड कारागृहाच्या चेकिंग गेटवर पकडण्यात आले. त्याने चरसच्या कॅप्सूल पॅक करून त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून ठेवल्या होत्या. नाईक हा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याला ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्याच्याकडून सुमारे आठ कॅप्सूल सापडल्या. या कॅप्सूल आरोपी नाईकला हे ड्रग्ज राहुल या कैद्याने दिल्या होत्या. या कॅप्सूल अतिसुरक्षा सर्कल ०२मधील आरोपी राशीद याला देण्यास सांगितल्या होत्या. त्यावेळी त्याला कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्याला अटक केली. त्यावेळी हवालदार नाईक याने त्याला तपासणाऱ्या पोलीस हवालदाराच्या हाताचा चावा घेतला आणि पळून जाण्याचा प्रयत्न कला. तो पळून जात असताना त्याला मुख्य गेटवर पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले. नाईकल ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.