Assembly Election 2024 :मुख्यमंत्री कोण होणार ? भाजपा नेत्याचे मोठे विधान; म्हणाले…

108

राज्यात सकाळी ८ वाजल्यापासून विधासभा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आघाडी पिछाडीच्या या खेळात कोणत्या पक्षाला जास्त बहुमत मिळणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pavin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  (Assembly Election 2024)

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. असे विधान केले आहेत.  मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रात महायुती २०० पार जाईल असे चित्र दिसून येत आहे. माझ्या मताने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस, बाजूने उभा आहे. त्यामुळे महायुतीला एक मोठे यश मिळत आहे. आता संजय राऊत आणि विरोधी पक्ष रडीचा डाव खेळू लागलेत. माझ्या मताने लोकशाहीमध्ये पराभव आपण मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. आता संजय राऊत यांनी विमान खाली उतरावे. त्यांना आता वेड्याच्या रूग्णालयात दाखल करावे लागेल, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीसांचा विजय निश्चित; सलग सहाव्यांदा करणार प्रतिनिधित्व)

दरम्यान, भाजपच्या १२७ जागा, शिवसेनेच्या ५६ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३९ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. मविआतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १२ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १८ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस १९ जागांवर आघाडी आहे.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.