Atal Setu Suicide Case : अटल सेतू पुलावरून बँक उपव्यवस्थापकाची आत्महत्या, मृतदेहाचा शोध सुरू 

113
Atal Setu Suicide Case : अटल सेतू पुलावरून बँक उपव्यवस्थापकाची आत्महत्या, मृतदेहाचा शोध सुरू 
Atal Setu Suicide Case : अटल सेतू पुलावरून बँक उपव्यवस्थापकाची आत्महत्या, मृतदेहाचा शोध सुरू 

शिवडी-न्हावाशेवा (Shivdi-Nava Sheva) अटल सेतू वरून एका व्यक्तीने उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आली असून सुशांत चक्रवर्ती (Sushant Chakraborty) असे त्याचे नाव असून तो एका बँकेत उपव्यवस्थापक (Bank deputy manager commits suicide) या पदावर नोकरीला होता. कामाच्या तणावातून त्याने असे कठोर पाऊल उचलले असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते अशी माहिती शिवडी पोलिसांनी (Shivadi Police) दिली आहे. (Atal Setu Suicide Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवडी न्हावाशेवा अटल सेतू वरील नवीमुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील किलोमीटर क्रमांक ८.५ या ठिकाणी लाल रंगाची ब्रेजा क्रमांक (एमएच०१-डिटी-९१८८) ही कार बराच वेळेपासून उभी असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाली. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली असता कारमध्ये कोणीही मिळून आले नाही, दरम्यान ही माहिती शिवडी पोलिसांना देण्यात आली. शिवडी पोलिसांनी अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले एक व्यक्ती सकाळी ९:५७ च्या अटल सेतू पुलावर लाल रंगाचा ब्रेजा कारने अतुल सेतू पुलावर थांबला आणि कळण्याच्या आत त्याने कार मधून बाहेर पडून अटल सेतू वरून समुद्रात उडी घेतली. शिवडी पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला, सोमवारी दुपारी उशिरापर्यत शोध घेण्यात येत होता. (Atal Setu Suicide Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “आम्ही अटल सेतू पुलावर मिळून आलेल्या लाल रंगाच्या ब्रेजा कारचा क्रमांकावरून कार मालकाची माहिती काढली असता, सदर कार ही सुशांत चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असून परळ टेकडी असा पत्ता देण्यात आला आहे, पोलिसांनी कुटूंबियांशी संपर्क साधला असता त्यांची पत्नीशी संपर्क झाला. अटल सेतुवरून उडी टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव सुशांत चक्रवर्ती (४०) सुशांत एका सरकारी बँकेत विमा पॉलिसी विभागात डेप्युटी मॅनेजर या पदावर नोकरीला होता. त्यांची पत्नीने शिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की सुशांत चक्रवर्ती (Sushant Chakraborty) हा सकाळी कामावर जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता, मागील काही आठवड्यापासून त्याला कामाचा अधिक ताण होता, त्यात तो मागील काही दिवसापासून तणावात होता अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

(हेही वाचा – MLA Mehboob Ali यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, मुस्लिम लोकसंख्या वाढलीय, आता भाजपची राजवट…)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत हा सकाळी शिवडी येथून न्हावाशेवा अटल सेतुवर गेला, मात्र अटल सेतुवर कर्मचारी असल्यामुळे त्याने टोल नाका ओलांडून न्हावा शेवाच्या दिशेने गेला, तेथून त्याने वळण घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने आला आणि त्याने शिवडीच्या हद्दीत अटल सेतुवर कार उभी करून समुद्रात उडी घेतली, ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याचा मृतदेहाचा शोध सुरू आहे अशी माहिती शिवडी पोलिसांनी दिली आहे. पोलीसानी या घटनेची नोंद केली असून मृतदेह मिळून आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Atal Setu Suicide Case)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.