बी. सरोजा देवी (B Saroja Devi) या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे बंगलोर सरोजा देवी. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९३८ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांनी कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी सहा दशकांमध्ये सुमारे २०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांना “अभिनय सरस्वती” (Abhinaya Saraswati) आणि “कन्नडथु पिंगिली” (Kannadathu Pingili) या नावांनी देखील ओळखले जाते.
(हेही वाचा – Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीनिमित्त ‘ठाणे कारागृह ते सावरकर स्मारक’ बाईक रॅली)
तामिळमधील आघाडीच्या अभिनेत्री
त्यांचे वडील भैरप्पा म्हैसूरमध्ये पोलिस अधिकारी होते आणि आई रुद्रम्मा गृहिणी होती. वडिलांनी त्यांना नृत्य शिकण्यास सांगितले आणि अभिनय करण्यास प्रोत्साहन दिले. वयाच्या १३ व्या वर्षी एका कार्यक्रमात गात असताना बी.आर. कृष्णमूर्ती यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली.
पुढे वयाच्या १७ व्या वर्षी १९५५ मध्ये ‘महाकवी कालिदास’ या पहिल्या कन्नड चित्रपटातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. तेलुगू चित्रपटसृष्टीत, त्यांनी १९५९ मध्ये पांडुरंगा महात्म्य पदार्पण केले आणि त्यांचा पहिला तमिळ चित्रपट नदोदी मन्नन होता, या चित्रपटामुळे त्या तामिळमधील आघाडीच्या अभिनेत्री झाल्या. १९५९ मध्ये सरोजा देवी यांनी पैगाम या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केले. ज्यात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केले होते. पैगाम व्यतिरिक्त त्यांनी इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
(हेही वाचा – Meenatai Thackeray Market : दादरच्या मिनाताई ठाकरे फुल मार्केटचा होणार पुनर्विकास)
बंगळुरू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
विविध भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणार्या त्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. १९५५ ते १९८४ दरम्यान त्यांनी सलग २९ वर्षांत १६१ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. सरोजा देवी यांना १९६९ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना बंगळुरू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट आणि तामिळनाडूचा कलीममणी पुरस्कारही मिळाला आहे. (B Saroja Devi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community