BJP Candidate List : भाजपाने शिवसेनेच्या ५ जागांवर दिले उमेदवार

59

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर केली आहे, ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामुळे मविआवर दबाव आला आहे. मात्र या यादीत भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेच्या ५ जागांवर उमेदवार दिले आहेत. धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण हे मतदारसंघ शिवसेनेचे होते. पण आता या मतदारसंघात भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेनेच्या पाच जागांवर भाजपाकडून BJP उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून कोणते मतदारसंघ लढवण्यात येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

धुळ्यात 2019 ला शिवसेनेचे हिलाल माळी हे धुळे शहराचे उमेदवार होते. पण याच मतदारसंघातून भाजपाकडून BJP यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूरमधून अतुल तायडेंना भाजपाने यंदा उमेदवारी दिली. याच मतदारसंघातून सुनिता फिसके या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. देवळी मतदारसंघात भाजपाकडून राजेश बकानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाचे राजन नाईक हे नालासोपाऱ्यातून उमेदवार आहेत. 2019 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा उमेदवार होते. उरणमधून भाजपाने महेश बालदींना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर हे 2019 ला उमेदवार होते. त्यामुळे या पाच मतदारसंघावर भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे नालासोपाऱ्यात कोणाताही भाजपाचा आमदार किंवा भाजपाचा पाठिंबा असलेला अपक्ष आमदार निवडून आलेला नसताना या मतदारसंघात भाजपाने आपला उमेदवार दिला.

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.