BMC and Railway Meeting : रुळांवर साचणाऱ्या पाण्यावर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची बैठक, रेल्वे मार्गासह निवासी भागांतील नाल्यांचे रुंदीकरण करण्याची सूचना

258
BMC and Railway Meeting : रुळांवर साचण्याच्या पाण्यावर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची बैठक, रेल्वे मार्गासह निवासी भागांतील नाल्यांचे रुंदीकरण करण्याची सूचना
BMC and Railway Meeting : रुळांवर साचण्याच्या पाण्यावर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची बैठक, रेल्वे मार्गासह निवासी भागांतील नाल्यांचे रुंदीकरण करण्याची सूचना

विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी उपनगरीय रेल्‍वे सेवा (Local Railway) सुरळीत सुरू राहण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आणि रेल्‍वे प्रशासन यांनी समन्‍वयाने कार्यरत राहिले पाहिजे.  नाल्‍यातील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे केवळ पावसाळापूर्व अथवा पावसाळयातच नव्‍हे तर संपूर्ण वर्षभर सुरू राहिली पाहिजेत अशी, खबरदारी बाळगावी, असे  स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले.  या बैठकीत काही भागांमधील रेल्वे भाग (पोर्शन) वगळता निवासी भागातील पावसाळी जलवाहिनी जाळ्यांचे विस्तारीकरणाची बाब रेल्वे अधिकाऱ्यांनी  निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेतर्फे करावयाच्या कामांची यादी विना-विलंब तयार करुन त्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरु करावी. शक्यतो  पुढील पावसाळ्यापूर्वी कामे वेगाने पूर्ण करावीत. अशा प्रकारचाही निर्णय घेण्यात आला आहे. ( BMC and Railways Meeting )

मुंबई महानगरात बुधवारी २५ सप्‍टेंबर २०२४ रोजी अवघ्‍या काही तासात २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला. त्‍यामुळे उपनगरीय रेल्‍वे सुविधा बाधित झाली. रेल्‍वे मार्गावर पाणी साचण्‍याच्‍या घटना घडल्‍याने मध्‍य रेल्‍वेची सेवा प्रभावित झाली. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी सोमवारी ३० सप्‍टेंबर २०२४ रोजी महानगरपालिका मुख्‍यालयात रेल्‍वे प्रशासन, महानगरपालिका पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग, पूल विभाग आणि रस्‍ते विभागातील प्रमुख अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत लोहमार्गांवर पाणी साचण्‍याच्‍या घटनांना प्रतिबंध करणे आणि त्‍यावर कायमस्‍वरूपी उपाययोजना आखणे या विषयावर सखोल चर्चा झाली.

लोहमार्गावरील पाणी साचण्‍याची ठिकाणे आणि त्‍यावर उपाययोजनांची स्‍थळपरत्‍वे चर्चा झाली. त्‍यात मध्‍य रेल्‍वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भांडुप स्‍थानक, विद्याविहार स्‍थानक, सायन – माटुंगा दरम्‍यानचा रेल्‍वे मार्ग, विक्रोळी – कांजूरमार्ग दरम्‍याचा रेल्‍वे मार्ग, हार्बर रेल्‍वेचा शिवडी – वडाळा मार्ग, कुर्ला स्‍थानक, कुर्ला – मानखुर्द मार्ग, गुरू तेगबहादूर नगर – चुनाभट्टी, कुर्ला – टिळक नगर आदी ठिकाणांचा समावेश आहे. ( BMC and Railways Meeting )

(हेही वाचा –  Aheri मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी)

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) म्‍हणाले की,  पावसाळापूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून, महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपनगरीय लोहमार्गावर रुळाखालील नाल्यांच्या प्रवाहामधून गाळ काढणे, लोहमार्गाची स्वच्छता करणे ही कामे दरवर्षी केली जातात. नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणीही बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, या कामांचा देखील त्‍यात समावेश असतो. मुंबई उपनगरीय रेल्वे थांबल्यास मुंबईचे जनजीवन ठप्प होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन स्‍वखर्चाने नालेस्‍वच्‍छतेची कामे करते. काही कामे रेल्‍वे विभागामार्फत केली जातात.  परंतु, महानगरपालिकेमार्फत रेल्‍वे विभागाला निधी दिला जातो. मुंबई महानगरात बुधवारी २५ सप्‍टेंबर २०२४ रोजी अवघ्‍या काही तासात २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला. त्‍यामुळे उपनगरीय रेल्‍वे सुविधा बाधित झाली. अशा घटना पुन्‍हा घडू नयेत, यासाठी महानगरपालिका आणि रेल्‍वे विभागाने एकत्रितपणे कामे केली पाहिजेत. रेल्वे परिसरातील कलव्हर्टची स्वच्छता मोहीम संयुक्तपणे पूर्ण करावी. रेल्‍वे विभागाच्‍या अखत्‍यारितील कामे केवळ पावसाळापूर्व अथवा पावसाळयापुरतीच मर्यादीत न राहता वर्षभर सुरू राहिली पाहिजेत. महानगरपालिका पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग, पूल विभाग, रस्‍ते विभाग आणि प्रशासकीय विभाग (वॉर्ड) यांनी सहकार्याने आणि समन्‍वयाने कामे पूर्ण करावीत. कमीत कमी कालावधीत आणि विहित वेळेत कामे पूर्ण झाल्‍यास पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल, अशा त-हेने उपाययोजना करण्‍याचे दिशानिर्देश बांगर यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – Cabinet Meeting : वर्तुळाकार मेट्रो, भुयारी मार्गामुळे मुंबई, ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फुटणार)

रेल्वे विभाग आणि पर्जन्य जलवाहिनी विभाग यांच्या चर्चेतून स्थळनिहाय कोणती कार्यवाही केली पाहिजे, याची  निश्चिती या बैठकीत करण्यात आली. काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील भाग अरुंद असल्याकारणाने त्याचे विस्तारीकरण (Augmentation) करण्याची  विनंती रेल्वे विभागाने केली. त्यापैकी काही कामे रेल्वे विभाग महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या निधीतून करणार असून, काही कामे महानगरपलिकेने करावीत, अशीही विनंती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच काही भागांमधील रेल्वे भाग (पोर्शन) वगळता निवासी भागातील पावसाळी जलवाहिनी जाळ्यांचे विस्तारीकरणाची बाब रेल्वे अधिकाऱ्यांनी  निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेतर्फे करावयाच्या कामांची यादी विना-विलंब तयार करुन त्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरु करावी. शक्यतो  पुढील पावसाळ्यापूर्वी कामे वेगाने पूर्ण करावीत. रेल्वे रुळाखालील बंदीस्त मार्गाचे विस्तारीकरण करताना पारंपरिक पद्धतीने अथवा मायक्रो टनेलिंग करण्याबाबत स्थळपरत्वे निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. ( BMC and Railways Meeting )

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.