BMC : पर्जन्य जलवाहिनीच्या गटारात पडलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृत्यूला एमएमआरसीएल जबाबदार? एल अँड टी वर फोडले खापर

487
BMC : पर्जन्य जलवाहिनीच्या गटारात पडलेल्या 'त्या' महिलेच्या मृत्यूला एमएमआरसीएल जबाबदार? एल अँड टी वर फोडले खापर
BMC : पर्जन्य जलवाहिनीच्या गटारात पडलेल्या 'त्या' महिलेच्या मृत्यूला एमएमआरसीएल जबाबदार? एल अँड टी वर फोडले खापर
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुसळधार पावसाप्रसंगी, अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी (Municipal Commissioner Bhushan Gagrani) यांना सादर केला आहे. या घटनास्थळ व परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) चे कंत्राटदार एल ऍण्ड टी (L&T) यांचे ताब्यात असल्याने त्याठिकाणी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी तसेच एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे. (BMC)

मुंबईत बुधवारी  २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसावेळी अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात एका महिलेचा पर्जन्य जलवाहिनीत कोसळून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी नियुक्त करण्यात आली होती. घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त महोदयांनी दिले होते. या चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला आहे. या त्रिसदस्यीय समितीने घटनेची सखोल चौकशी करुन निरीक्षणे नोंदवली आहेत व त्या आधारे निष्कर्ष मांडले आहेत. (BMC)

(हेही वाचा – Cabinet meeting: कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना दिलासा! मानधन वाढीसह अनुदान मिळणार: कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना दिलासा! मानधन वाढीसह अनुदान मिळणार)

अहवालातील निष्कर्षानुसार, सदर घटनास्थळ व सभोवतालचा परिसर हा सन २०१५ पासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) चे कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी मध्ये आढळलेल्या त्रुटी कंत्राटदार एल ऍण्ड टी यांना कळवल्या होत्या. त्यावर, दोष दायित्व कालावधी (हमी कालावधी) मध्ये महानगरपालिकेला काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता करण्यास बांधिल आहे,  असे एल ऍण्ड टी यांना २४ ऑगस्ट २०२४ व २९ ऑगस्ट २०२४ च्या पत्राद्वारे एमएमआरसीएल यांना सादर केले होते. एकूणच, दुर्घटनेच्या ठिकाणांच्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी व एमएमआरसीएल यांची आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

(हेही वाचा – CBI ची देशात ३२ ठिकाणी छापेमारी, पुण्यात १० आणि इतरत्र १६ म्होरक्यांना अटक)

त्याचप्रमाणे, के पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या विषयाबाबत कार्यवाही केली आहे. असे असले तरी दुर्घटना घडली तो रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने व अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) घोषित असताना महानगरपालिकेच्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना दक्ष राहणे आवश्यक होते, असा निष्कर्ष देखील समितीने मांडला आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ ३ चे उप आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले. प्रमुख अग्निशमन अधिकारी  रवींद्र अंबुलगेकर (Fire Officer Ravindra Ambulgekar) आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.