मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) फोडण्यासाठी राज्य सरकारने ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह भूयारी मार्ग (Orange Gate to Marine Drive underground), ठाणे ते बोरीवली भूयारी मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार रेल्वे मेट्रो प्रकल्प (Ring Metro Project) प्रस्तावित आहे. या कामाला गती देण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा सोमवारी निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (Cabinet Meeting )
(हेही वाचा – BMC : पर्जन्य जलवाहिनीच्या गटारात पडलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृत्यूला एमएमआरसीएल जबाबदार? एल अँड टी वर फोडले खापर)
मुंबईसह ठाणे जिल्ह्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कोंडी फोडण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. यापार्श्वभूमीवर रस्ते आणि मेट्रो मार्गाचे जाळे विणले जात आहे. मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा भुयारी मार्ग तयार केला जात असून या कामाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमएमआरडीएला यासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य दिले जाणार आहे. हा प्रकल्प नऊ हजार १५८ कोटी रुपयांचा असणार आहे. राज्य शासनाच्या करासाठी ६१४ कोटी ४४ लाख रुपये, केंद्राच्या कराच्या पन्नास टक्के रकमेसाठी ३०७ कोटी २२ लाख रुपये, भूसंपादनासाठी ४३३ कोटी असे एकूण एक हजार ३५४ कोटी ६६ लाख रुपये एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. (Cabinet Meeting )
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प
ठाणे ते बोरीवली या भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटी ४० लाख रुपयांच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सहा पदरी मार्गाच्या दुहेरी-भुयारी मार्गाचे बांधकाम प्रतिपदरी भुयारी मार्गाची एकूण ११. ८५ किमी अशी असणार आहे. एकूण १८ हजार ८३८ कोटी ४० लाख अशा किंमतीच्या प्रकल्पाची एमएमआरडीए मार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.
(हेही वाचा – BMC : पर्जन्य जलवाहिनीच्या गटारात पडलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृत्यूला एमएमआरसीएल जबाबदार? एल अँड टी वर फोडले खापर)
ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती
ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती दिली असून त्यासाठी आवश्यक १२ हजार २२० कोटी १० लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आली. या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी २९ किलोमीटर्स असून, २० उन्नत स्थानके व दोन भूमिगत स्थानके असणार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community