राज्यातील कोतवालाना मानधन (Kotwal salary increase) वाढीसह अनुकंपा धोरण तर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) घेण्यात आला. या निर्णयामुळे कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Cabinet meeting)
राज्यात १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ दिली जाणार आहे. तसेच सेवेत असताना मृत्यू झाल्यास, किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाईल. या संदर्भातील धोरणाला मान्यता देण्यात आली. शिवाय राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी २ हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत. त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रूपये व दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देणार, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. (Cabinet meeting)