ऋजुता लुकतुके
केंद्र सरकार सध्या direct-to-home टीव्ही चॅनलच्या धर्तीवर direct-to-mobile टीव्ही वाहिन्या दाखवण्यासाठी चाचपणी करत आहे. तसं झालं तर टीव्ही वाहिन्या तुम्ही थेट मोबाईलवर पाहू शकाल आणि ते ही इंटरनेट न वापरता डायरेक्ट टू होम (DTH) प्रमाणेच आता टीव्ही वाहिन्या थेट मोबाईलवर म्हणजे डायरेक्ट टू मोबाईल (D2M) सेवा सुरू करण्यावर सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. मोबाईलवर वाहिन्या पाहताना इंटरनेटही वापरावं लागणार नाही. जगभरात अशा प्रणालीला D2M म्हणजे डायरेक्ट टू मोबाईल प्रणाली असं म्हटलं जातं. यात केबल किंवा DTH जोडणीच्या आधाराने मोबाईलवर टीव्ही वाहिन्यांचं थेट प्रक्षेपण दाखवलं जाईल. त्यामुळे तुम्हाला मोबाईल डेटा वापरावा लागणार नाही.
इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या वेबसाईटने सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही बातमी सर्व प्रथम छापली आहे. त्यानंतर तिची चर्चा सुरू झाली आहे. या बातमीनुसार, अशा तंत्रज्ञान विकासासाठी केंद्रसरकारची दूरसंचार (Department of Telecommunications) आणि माहिती तंत्रज्ञान (Department of Information & Technology) ही खाती आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) मदतीने योजना आखत आहेत.
“The technology, called ‘direct-to-mobile’ (D2M) broadcasting, promises to improve consumption of broadband and utilisation of spectrum” @IITKanpur https://t.co/N1EqbGUCaV
— Prasar Bharati प्रसार भारती (@prasarbharati) June 4, 2022
अर्थात, असं तंत्रज्ञान विकसित करायचं झालं तर टेलिफोन कंपन्यांचा त्याला विरोध नाकारता येत नाही. कारण, एअरटेल, व्होडाफोन, जिओ यासारख्या कंपन्यांचा मोठा महसूल हा डेटा प्लानमधून येतो. आणि ग्राहकांचा ओढा मोबाईलवर व्हीडिओ बघण्याकडेच आहे. अशावेळी ही गरज D2M ने भागणार असेल तर मोबाईल इंटरनेटच्या मागणीला खिळ बसेल. शिवाय सध्या मोबाईल कंपन्या 5G जाळं तयार करण्यात गुंतल्या आहेत. यात त्यांनी मोठी गुंतवणूकही केली आहे. अशावेळी अचानक D2M आलं तर कंपन्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
(हेही वाचा – World University Games 2023 : ज्योती येराजीने राष्ट्रीय विक्रमासह जिंकलं कांस्य पदक)
पण, हा मुद्गाही सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये विचारात घेतला जात असल्याचं इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीत म्हटलं आहे. आणि पुढच्या बैठकांमध्ये टेलिफोन सेवा चालवणाऱ्या कंपन्यांनाही समाविष्ट करून घेतलं जाईल, असं सरकारी सूत्रांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं आहे. अगदी पुढच्या आठवड्यात पुढची बैठक होणार आहे. आणि यात सरकारी यंत्रणेबरोबरच आयआयटी कानपूरचे शास्त्रज्ञ तसंच केबल टीव्ही आणि टेलिफोन कंपन्यांचे प्रतिनिधीही सहभागी असतील. ही सेवा सुरू करण्यामागे केंद्र सरकारचा हेतू दोन तंत्रज्ञानांचा हा मिलाफ आहे. ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट यांचा मिलाफ सरकारला अपेक्षित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community